The Web has lots and tons of information, but there are certain cases wherein either information is not available or is on paid terms.
Recently i was on the lookout of Haripath abhang from Sant Dyaneshwar, although there is a youtube video available at this link, but there aren't any lyrics.
So i decided to type the Sant Dyaneshwar abhangs in Marathi.
१
देवाचिया द्वारी उभा क्षणभरी । तेणें मुक्ती चारी साधियेल्या ।। १ ।।
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कौण करि ।। २ ।।
असोनी संसारी जिव्हे वेगु करी । वेद्शाश्त्र उभारी बाह्या सदा ।। ३ ।।
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी ।। ४ ।।
२
चहू वेदीं जाण पाट्शास्त्री कारण । आठराहीं पुरणे हरिसी गाती ।। १ ।।
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ।। २ ।।
एक हरी आत्मा जीवशिव सम । वायां दुर्गमी न घालीं मन ।। ३ ।।
ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ । भरला घनदाट हरी दिसे ।। ४ ।।
३
त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरीपाठ ।। १ ।।
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिविणे मत व्यर्थ जाय ।। २ ।।
अव्यक्त निराकार राहीं ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासी भजे ।। ३ ।।
ज्ञानदेव ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जान्मानी पुण्या होय ।। ४ ।।
४
भावेंवीण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेंवीण शक्ती बोलू नये ।। १ ।।
कैसेनि दैवत प्रसन त्वरित । उगा राहें निवांत शीणसी वायां ।। २ ।।
सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणे ।। ३ ।।
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । तुटेल धरणे प्रपंचाचें ।। ४ ।।
५
योग याग विधी येणें नोहे सिद्धी । वायांची उपाधि दंभधर्म ।। १ ।।
भावेंवीण देव न कळे नि:संदेह । गुरुवीण अनुभव कैसा कळे ।। २ ।।
तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेवीण हित कोण सांगे ।। ३ ।।
ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात । साधूचे संगती तरुणोपाय ।। ४ ।।
६
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुरला अनुभवें ।। १ ।।
कापुराची वाती उजळती ज्योती । ठायींच समाप्ती झाली जैसी ।। २ ।।
मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरीभक्त ।। ३ ।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरी दिसे जनीं आत्मतत्वीं ।। ४ ।।
७
पर्वताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तांसी ।। १ ।।
नाहीं ज्यासीं भक्ती ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ।। २ ।।
अनंत वाचाल बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरी ।। ३ ।।
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्णे एक नांदे ।। ४ ।।
८
संतांचे संगती मनोमार्गगती । आकळावा श्रीपति येणें पंथे ।। १ ।।
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ।। २ ।।
एकतत्वी नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ।। ३ ।।
नाममृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ।। ४ ।।
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ।। ५ ।।
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।। ६ ।।
९
विष्णुवीणे जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णी मन नाहीं ज्याचे ।। १ ।।
उपजोनी करंटा नेणें उद्द्य वाटा । रामकृष्णी पैठा कैसा होय ।। २ ।।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । त्या कैंचें कीर्तन घडे नामीं ।। ३ ।।
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचें ।। ४ ।।
१०
त्रिवेणीसंगमीं नाना तिथें भ्रमीं । चित नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ।। १ ।।
नामासी विन्मुख तो नर पापिया । हरीविण धावंया न पावे कोणी ।। २ ।।
पुरणप्रसिद्ध बोलिले वाल्मिकी । नामें तिन्ही लोक उद्धरती ।। ३ ।।
ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचें । परंपरा त्यांचे कळ शुद्ध ।। ४ ।।
११
हरिउच्चारणी अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ।। १ ।।
तृण अग्निमेळें समरस झाले । तैसें नामें केलें जपता हरी ।। २ ।।
हरिउच्चारण मंत्र पैं अगाध । पळे भूतबाधा भय यांचे ।।३ ।।
ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ।। ४ ।।
१२
तीर्थ व्रत नेम भावेविण सिद्धी । वायांची उपाधी करिसी जनां ।। १ ।।
भावबळें आकळे येरवी नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरी ।। २ ।।
पारियाचा रवा घेतां भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ।। ३ ।।
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ।। ४ ।।
१३
समाधी हरीची सम सुखेंविण । न साधेल जाण द्वैतबुद्धी ।। १ ।।
बुद्धीचें वैभव अन्य नाही दुजें । एका केशवराजे सकळ सिद्धी ।। २ ।।
ऋिद्ध सिद्धी अन्य निधि अवधीच उपाधी । जंव त्या परमानंदी मन नाहीं ।। ३ ।।
ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ।। ४ ।।
१४
नित्य सत्य मित हरीपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ।। १ ।।
रामकृष्णी वाचा अनंतराशी तप । पापाचे कलप पळती पुढे ।। २ ।।
हरी हरी हरी मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ।। ३ ।।
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निज स्थान ।। ४।।
१५
एक नाम हरी द्वैतनाम दूरी । अद्वैत कुसरी विरळा जाणे ।। १ ।।
समबुद्धी घेतां समान श्रीहरी । शमदमां वरी हरी झाला ।। २ ।।
सर्वघटी राम देहादेहीं एक । सुर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी ।। ३ ।।
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ।। ४ ।।
१६
हरीनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ राम कृष्ण ।। १ ।।
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धी ।। २ ।।
सिद्धी बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निमाले साधुसंगे ।। ३ ।।
ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा । तेणें दशा दिशा आत्माराम ।। ४ ।।
१७
हरीपाठकीर्ती मुखें जरी गाय । पवित्रची होय देह त्याचा ।। १ ।।
तपाचें सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ।। २ ।।
मातृपितृभ्रात सगोत्र अपार । चतुर्भुज नर होउनि ठेले ।। ३ ।।
ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृतीनें दिधलें माझें हातीं ।। ४ ।।
१८
हरीवंशपुरण हरीनाम संकीर्तन । हरिविण सौजन्य नेणे कोणी ।। १ ।।
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकाळही घडलें तीर्थटण ।। २ ।।
मनोमार्गे गेला तो तेथें मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ।। ३ ।।
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णी आवडी सर्वकाळ ।। ४ ।।
१९
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापें अनंत कोटी गेलीं त्यांची ।। १ ।।
अनंत जन्मांचे तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठी ।। २ ।।
योग याग ित्रया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठी ।। ३ ।।
ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ।। ४ ।।
२०
वेदशास्त्रपुराण श्रुतिचे वचन । एक नारायण सारा जप ।। १ ।।
जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगािच श्रम व्यर्थ जप ।। २ ।।
हरिपाठी गेले ते निवांतािच ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ।। ३ ।।
ज्ञानदेवीं मंत्र हरिनामाचें शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेलें ।। ४ ।।
२१
काळ वेळ नाम उच्चारीतां नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ।। १ ।।
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरी एक ।। २ ।।
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वाणी ।। ३ ।।
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पुर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ।। ४ ।।
२२
नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्षुमिवल्लभ त्यां जवळी ।। १ ।।
नारायण हरी नारायण हरी । भक्ती मुक्ती चारी घरीं त्यांच्या ।। २ ।।
हरिविण जन्म नर्कचि पै जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ।। ३ ।।
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहे ।। ४ ।।
२३
सात पांच तीन दशकांचा मेला । एक तत्वी कळा दावी हरी ।। १ ।।
तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ।। २ ।।
अजपा जपणें उलट प्राणाचा ।येथेंहीं मनाचा निर्धार असे ।। ३ ।।
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णी पंथ क्रमियेला ।। ४ ।।
२४
जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वाघटीं राम भाव शुद्ध ।। १ ।।
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ।। २ ।।
जाति िवत्त गोत्र कुल शील मात । भजकां त्वरित भावनायुक्त ।। ३ ।।
ज्ञानदेव ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनीं घर केलें ।। ४ ।।
२५
जाणीव नेणीव भगवंती नाही । हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ।। १ ।।
नारायण हरी उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाही ।। २ ।।
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतुंसीं केवीं कले ।। ३ ।।
ज्ञानदेव फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ।। ४ ।।
२६
एक तत्व नाम दृढ धरीं मना । हरिसी करुणा येईल तुझी ।। १ ।।
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सदद जपे आधी ।। २ ।।
नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा । वायां आणि पंथा जाशी झणी ।। ३ ।।
ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ।। ४ ।।
२७
सर्व सुखे गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ।। १ ।।
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिविण ।। २ ।।
नाममंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णी संकल्प धरुनी राहे ।। ३ ।।
निजवृत्ती हे काढी माया तोडी । इंद्रियांसवडी लपुं नको ।। ४ ।।
तिथीं व्रतीं भाव धरीं रे करुणा । शांति दया पाहुणा हरी करी ।। ५ ।।
२८
अभंग हरिपाठ असती आठ्ठवीस । रचिले विश्वासे ज्ञानदेंवें ।। १ ।।
नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ।। २ ।।
असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मन । उल्हासें करून स्मरण जीवी ।। ३ ।।
अंतकाळी तैसा संकटाचें वेळीं । हरी तया सांभाळी अंतब्राह्य ।। ४ ।।
संतसज्जनांनी घेतली प्रचीती । आळशी मंदमती कैवीं तरें ।। ५ ।।
श्रीगुरू निवृत्ती वचन प्रेमल । तोषला तात्काळ ज्ञानदेव ।। ६ ।।
जय जय रामकृष्ण हरी । जय जय रामकृष्ण हरी ।।